Home मनोरंजन “नारे देशभक्तीचे आणि नागरिकत्व सोडून कॅनडाला जातो”, या प्रश्नाचे दिले अक्षय कुमार...

“नारे देशभक्तीचे आणि नागरिकत्व सोडून कॅनडाला जातो”, या प्रश्नाचे दिले अक्षय कुमार ने उत्तर

0

बॉलीवूड मधील अनेक सुपरस्टारांमधील एक सर्वांचा चहीता म्हणजे अक्षय कुमार. खिलाडी या नावाने ओळखला जाणारा अक्षय कुमार याने आजपर्यंत अनेक सुपरहिट सिनेमे दिले मात्र त्याच्या कॅनडाच्या नागरिकतेवरून त्यावर नेहमीच टीका केली जाते.

याबाबत अक्षय कुमार याने सांगितले की, ” माझ्या आयुष्यात एकामागे एक १४ सिनेमे हे फ्लॉप गेले आणि त्यानंतर मला असे वाटू लागले की आपलं भारतातील करिअर संपुष्टात आले आहे. यानंतर मला माझ्या कॅनडा मधील मित्राने तिकडे बोलावले आणि त्याने सांगितले की कॅनडा मध्ये आपण सोबत काम करूया त्यासाठी तू इकडे पासपोर्ट साठी अर्ज कर. पण सुदैवाने माझा १५ वा सिनेमा प्रचंड चालला आणि मात्र त्यानंतर मी मागे वळून पाहिले नाही. आणि त्यानंतर माझ्या डोक्यात कॅनडा चा विचार सुद्धा आला नाही”

खिलाडी अक्षय कुमारने आता भारतीय पासपोर्ट साठी अर्ज केला असून त्याच्यावर प्रक्रिया सुरू आहे. अक्षयने आजपर्यंत अनेक सिनेमे दिले मात्र त्याने दिलेल्या देशभक्ती दाखवणाऱ्या सिनेमांचे भारतीय प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान आहे. सिनेमा सोडून देशाची मदत करण्यात सुद्धा अक्षय अग्रेसर आहे. सर्वात जास्त आयकर भरणारा नट म्हणून त्याची ओळख आहे. त्यापलीकडे त्याने मुंबई पोलिसांना केलेली मदत सुद्धा अतुलनीय आहे. मागच्या महिन्यात त्याने सर्व अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या लोकांसाठी एक अभिमान गीत तयार केले होते. नेटकर्यांनी अक्षरशः त्या गाण्याला डोक्यावर उचलून धरले होते.