Home खेळ स्पर्धा ट्विटच्या माध्यमातून गायिका सोना मोहापात्राने सचिन तेंडुलकरला ‘MeToo’ ची आठवण करून दिली

ट्विटच्या माध्यमातून गायिका सोना मोहापात्राने सचिन तेंडुलकरला ‘MeToo’ ची आठवण करून दिली

0

भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या स्वभावाशी केवळ भारतच नाही तर सबंध जग अनुरूप आहे. शांत, कायम कलागुणांना वाव देणारा सचिन कायम सर्वांची मदत करण्यासाठी तत्पर असतो. मात्र सचिनने केलेल्या एका ट्विट वरून गायिका सोना मोहापात्राने सचिनला ‘MeToo’ ची आठवण करून दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सचिनने ट्विटरच्या माध्यमातून इंडियन आयडॉलच्या स्पर्धकांचे भरभरून कौतुक केले होते. ज्यात त्याने लिहिले आहे की, “इंडियन आयडॉल या कार्यक्रमातील स्पर्धकांची गाणी आणि त्यांच्या आयुष्याच्या कहाण्या मनामध्ये घर करत आहेत. राहुल, चेल्सी, दिव्या आणि सनी (इंडियन आयडॉल कार्यक्रमाचे स्पर्धक) हे चौघे देशांतील विभिन्न भागांतून येत असले तरी संगीताबद्दल त्यांच्यामध्ये समर्पण पाहायला मिळते. मला आशा आहे की ते भविष्यात नक्कीच मोठी मजल मारतील.” सचिनची ट्विट पुढील प्रमाणे…

सचिनच्या या गुणगौरव आणि कला गुणांना वाव देणाऱ्या ट्विटवर सोनाने पुढील प्रमाणे प्रतिक्रिया दिली, “प्रिय सचिन सर, तुम्हाला ‘MeToo’ बद्दल माहिती आहे का? इंडियन आयडॉल स्पर्धेचे परिक्षक आणि संगीतकार अन्नु मलिक यांचे नावही ‘MeToo’ प्रकरणात आले होते. त्याचबरोबर निर्मात्यांचेही नाव यामध्ये होते.” सोनाची ट्विट पुढील प्रमाणे...

आता प्रश्न आहे की कुणाच्याही अधे-मधे नसणाऱ्या सचिनच्या ट्विटवर सोनाने अशी जळजळीत प्रतिक्रिया का व्यक्ती केली? सध्या सोशल मीडियावर हा चर्चेचा विषय ठरला आहे.