Home मनोरंजन “अशा महिलांच्या पोटीच बलात्कारी जन्म घेतात” कंगनाच वादग्रस्त विधान

“अशा महिलांच्या पोटीच बलात्कारी जन्म घेतात” कंगनाच वादग्रस्त विधान

0

निर्भया प्रकरणाच्या वरिष्ठ महिला वकील अर्थात इंदिरा जयसिंह यांनी आपल्या ट्विटर हँडल वरून एक पोस्ट शेयर करत ‘निर्भयाच्या आईने आरोपींना माफ करावे’ असे आवाहन केले होते. दरम्यान जयसिंह यांनी यासाठी राजीव गांधी हत्याप्रकरण व सोनिया गांधी यांचे उदाहरण दिले. त्यांच्या या विधानावर बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतने मुंबईत बुधवारी ‘पंगा’ या सिनेमाच्या प्रिमियर दरम्यान झालेल्या पत्रकार परिषदेत कंगना बोलतांना खूपच संताप व्यक्त केला. बोलतांना तिचं जिभेवरील संतुलन सुटलं आणि ती म्हणाली, “अशा महिलांच्या पोटीच बलात्कारी जन्म घेतात.”

लोकसत्ताच्या एका रिपोर्ट नुसार कंगना म्हणाली, “अशा महिलेला चार दिवस निर्भयाच्या आरोपींसोबत तुरुंगात ठेवायला पाहिजे. या अशा महिला आहेत ज्यांना बलात्कारातील आरोपींवर दया येते. अशाच महिलांच्या पोटी असे नराधम जन्म घेतात.” केवळ कंगनाच नाही तर निर्भयाच्या आई देखील इंदिरा जयसिंह यांच्या विधानावर संतापल्या व म्हणाल्या, “यांच्यासारख्या लोकांमुळेच बालत्कार पीडितांना न्याय मिळत नाही. सबंध देश फाशीची मागणी करतोय अन् या इंदिरा जयसिंह कोण आहेत, ज्या मला सल्ला देत आहेत.” असा पीडिताच्या आईने संताप व्यक्त केला.