Home मनोरंजन आणि रेल्वे मध्ये पोलिसांनीच अशोक सराफ यांची घेतली फिरकी, पुढे काय झालं...

आणि रेल्वे मध्ये पोलिसांनीच अशोक सराफ यांची घेतली फिरकी, पुढे काय झालं ?

0

प्राइम नेटवर्क : मराठी फिल्म इंडस्ट्रीतील अभिनय आणि कॉमेडीचा बादशहा अशी ओळख असलेले जेष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा आज ४ जून वाढदिवस. जवळपास ४० वर्षांपेक्षा अधिक काळ हिंदी आणि मराठी फिल्म इंडस्ट्रीवर राज्य केलेला हा अभिनेता आपल्या प्रत्यक्ष जीवनात मात्र फारच निराळा होता. अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांचा प्रेम विवाह झालाय, मात्र दोघांच्या वयात तब्ब्ल १८ वर्षांचं अंतर, पण प्रेमात माणूस वय विसरतो अशा प्रकारे निवेदिता आणि अशोक सराफ स्वतःला विसरले, आणि आयुष्यभर प्रेमात अखंड बुडाले.

अशोक सराफ यांनी त्यांच्या आयुष्यातील एक मजेदार प्रसंग एका मुलाखती दरम्यान सांगितला होता. दादा कोंडके यांच्या सुपर हिट सिनेमात पांडू हवालदाराची भूमिका अशोक सराफ यांनी केली होती, आणि मराठी रसिकांना खूपच भावली होती, अशोक सराफ प्रसिद्ध झाले होते. मात्र त्यावेळी अभिनेत्यांना जास्त मानधन मिळत नसे. पांडू हलवलदार, नंतर एका नव्या सिनेमाच्या चित्रीकरणासाठी अशोक सराफ महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापूरला निघाले होते.

जवळ जास्त पैसे नसल्याने त्यांनी जनरल डब्यातून प्रवास करणं अधिक सोयीस्कर समजलं. यावेळी दोन पोलीस अशोक सराफ यांच्या समोरच्या आसनावर बसले होते, त्यांनी पांडू हवालदार सिनेमातील अशोक सराफ यांना ओळखलं, आणि अभिनेत्यां पेक्षा आपलं आयुष्य कसं बरं, यावर गप्पा मारू लागले. त्यांच्या त्या तिरकस गप्पा ऐकून अशोक सराफ यांना ओशाळल्या सारखं झालं आणि त्यांनी पुढील कोल्हापूर पर्यंतचा प्रवास खिडकीकडे पाहून केला.

अशोक सराफ यांच्या सारखा चतुरस्त्र अभिनेता पुन्हा मराठी इंडस्ट्रीत होणे नाही, कारण अशोक सराफ यांनी कॉमेडी सह गंभीर भूमिका असो, हिरो असो वा व्हिलन असो, त्यांनी त्या पात्राची कधीच चिंता केली नाही, तर ती पात्र सिने जगतात कायमची अमर केली. याचंच फळ म्हणून १९७७ साली पाहिलं मराठीतील मानाचं फिल्म फेअर अवार्ड जिंकलं. अशा या चतुरस्त्र अभिनेत्याला प्राईम कडून वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.