Home मनोरंजन उरी सिनेमाचे इतके भन्नाट डायलॉग लेखकाला सुचले कसे ?

उरी सिनेमाचे इतके भन्नाट डायलॉग लेखकाला सुचले कसे ?

0

प्राईम नेटवर्क : “डॉन को पकडना मुश्किल हि नही.. नामुमकींन है।”,”तारीख पर तारीख.”, “मोगँबो खुश हुआ”,”पिक्चर अभि बाकी हैं मेरे दोस्त” असे एक ना अनेक फिल्मी डायलॉग आपण वापरत असतो. कधी कधी तर चित्रपट फ्लॉप होतो पण त्यातील डायलॉग मात्र बहोत बडी चीज होती है बाबू..आता तुम्ही म्हणाल “खामोश” आणि मुद्या काय ते तरी कळू दे.

मंडळी हे सगळं सांगायचं कारण म्हणजे अलीकडे प्रदर्शित झालेला “उरी-द सर्जिकल स्ट्राईक” या सुपरडुपर हिट झालेल्या सिनेमातील “हाऊ इज द जोश” हा डायलॉग प्रचंड गाजलाय. हा डायलॉग इतका गाजलाय की पंतप्रधान नरेंद्र मोदी ते त्यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांच्या भाषणातही या डायलॉगचा बोलबाला आहे. या संवादाची कल्पना नेमकी आली कुठून व कशी ??

या संवादाबद्दल चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य धर यांनी एक मजेशीर किस्सा सांगितला आहे. ते म्हणाले की, “माझे काही मित्र डिफेन्स बॅकग्राऊंडचे होते. त्यांच्या सोबत मी अनेकदा आर्मी क्लबमध्ये जायचो. या ठिकाणी एक माजी ब्रिगेडियर यायचे,ते आम्हाला पाहून हा डायलॉग म्हणायचे आणि त्यांच्या हातात चॉकलेट असायचे.”हाऊ इज द जोश?” असे ते विचारताच “हाई सर” असा जो तगड्या आवाजात उत्तर देईल त्याला ते चॉकलेट मिळायचे. सैन्यात फार कमी लोक या लाईनचा वापर करतात. मी या लाईनचा योग्य वापर केला आणि ही लाईन एका वेगळ्या उंचीवर पोहचली.”

“उरी द सर्जिकल स्ट्राईक” ची स्क्रिप्ट लिहायला सुरुवात केली तेव्हाच हा डायलॉग वापरायचा असे आदित्य धरनी ठरवले होते. चित्रपटाची कथा विहान शेरगिल या भारतीय जवानाभोवती फिरते. ही भूमिका विकी कौशलने नाद खुळाच सकारलेय. तुम्हाला काय वाटतं?