Home मनोरंजन ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत आता ‘ही’ अभिनेत्री साकारणार वहिनीसाहेबांची भूमिका!

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत आता ‘ही’ अभिनेत्री साकारणार वहिनीसाहेबांची भूमिका!

0

महाराष्ट्रातील घराघरात लोकप्रिय असलेली झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका गेल्या ४ वर्षांपासून प्रेक्षकांचे भरघोस मनोरंजन करत आहे. या मालिकेत लवकरच एक मोठा ट्विस्ट येणार आहे. या मालिकेतील खलनायकाची भूमिका करणारी नंदिता वहिनी अर्थात वहिनीसाहेबांची भूमिका आता एक नवीन अभिनेत्री साकारणार आहे. याअगोदर नंदिता वहिनीची भूमिका साकारणारी अभिनेत्री धनश्री काडगावकर सध्या प्रेग्नन्ट असल्याने ती काही दिवसांपासून मालिकेत दिसली नाही. त्यामुळे आता वहिनीसाहेब मालिकेत परत कधी येतील तसेच ही भूमिका कोण साकारेल याबद्दल या मालिकेच्या चाहत्यांना उत्सुकता लागून होती.

लोकमतच्या मीडिया न्यूजनुसार धनश्री काडगावकरने आता मालिकेचा निरोप घेतला असल्याने अभिनेत्री माधुरी पवार नंदिता वहिनीची भूमिका साकारणार आहे. माधुरी पवार झी युवा चॅनेलवरील अप्सरा आली या कार्यक्रमाची विजेती म्हणून नावारूपाला आली आहे. माधुरी पवारने आपल्या इंस्टाग्रामवर तुझ्यात जीव रंगला मालिकेचा एक प्रमो शेअर करत ती नंदिता वहिनीच्या रूपात दिसणार असल्याचे जाहीर केले. आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये माधुरीने वहिनीसाहेबांच्या स्टाईलमध्ये ‘२७ तारखेला लय डेंजर वादळ येतंय तेव्हा बघायला लागतंय ‘तुझ्यात जीव रंगला’ असे लिहिले. आज संध्याकाळी ७ वाजता प्रक्षेपित झालेल्या भागात माधुरी पवार वाहिनी साहेबांच्या भूमिकेत दिसली.

https://www.instagram.com/p/CGxk1_FBu5K/?utm_source=ig_web_button_share_sheet