Home मनोरंजन आपल्या भन्नाट डान्सने लोकांना वेड लावणारी ही जोडी सोशल मिडीवर फेमस…

आपल्या भन्नाट डान्सने लोकांना वेड लावणारी ही जोडी सोशल मिडीवर फेमस…

0

सध्या सोशल मीडियावर एका जोडीचा व्हिडीओ खूपच गाजत आहे. या दोघांनी १९८९ मध्ये रिलीज झालेल्या ‘मैने प्यार किया’ या सिनेमातील ‘दिल दिवाना बिन सजना के’ या गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. हे कपल सोशल मीडियावर चांगलंच फेमस होत असून यांचं भरभरून कौतुकही केलं जातं आहे. अर्थात याच्यावर काही लोक हसत आहेत, त्यांना ट्रोल करत आहेत मात्र जास्तीत जास्त लोकांनी त्यांचं कौतुकच केलं आहे.

हा व्हिडीओ सर्वप्रथम ट्विटरवर @bhaiyyajispeaks नावाच्या यूजरने शेअर केला. याला त्याने ‘भारत आणि बॉलिवूड’ असं कॅप्शन दिलं आहे. ना भारीतले कपडे ना कुठला मेकअप तरी देखील या कपलने केवळ आपल्या साधेपणाच्या बळावर लोकांची मनं जिंकली आहेत. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून लोक त्याला उत्तम प्रतिसादही देत आहेत.