Home मनोरंजन भारतातील या वेब सिरीजने पटकावला आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड!

भारतातील या वेब सिरीजने पटकावला आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड!

0

नेटफ्लिक्सवरील ‘दिल्ली क्राईम’ या वेब सिरीजला आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड मिळाला असून हा अवॉर्ड पटकावणारी ही पहिलीच भारतीय वेब सिरीज आहे. आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्डच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून याबद्दलची माहिती देण्यात आली.

२०१२ साली दिल्लीत घडलेल्या निर्भया सामूहिक बलात्कार व हत्याकांड प्रकरणावर आधारित ही वेब सिरीज आहे. या प्रकरणातील आरोपींना पकडण्यात आणि त्यांना शिक्षा मिळवून देण्यात पोलिसांना किती संघर्ष करावा लागला व कशा अडचणी आल्या याचे चित्रीकरण या ७ भागांच्या मालिकेत केले आहे.