Home मनोरंजन टिकटॉक बंदीमुळे मी आणि माझ्या दोन बायकांचे आयुष्य उध्वस्त झाले!

टिकटॉक बंदीमुळे मी आणि माझ्या दोन बायकांचे आयुष्य उध्वस्त झाले!

0

टिक टॉक अँप मुळें गल्ली बोळात सेलिब्रिटी जन्माला आले, या सेलिब्रिटींची फॅन फॉलोइंग साता समुद्रापार पोहोचली पण सरकारने केलेल्या टिक टॉक बंदीमुळे नावारूपास आलेले हे सेलिब्रिटी ढसा ढसा रडायला लागलेत. धुळे मधील एका टिक टॉक स्टार ने तर तो आणि त्याच्या दोन बायकांचे आयुष्य उध्वस्त झाले असल्याचे सांगत ढसाढसा रडला.

धुळे जिल्ह्यात राहणारे दिनेश पवार टिकटॉवर अतिशय प्रसिद्ध होते. त्यामुळे सरकारच्या निर्णयामुळे त्यांना मोठा धक्का बसला आहे. ‘आम्ही उद्ध्वस्त झालो. मात्र आमच्या बाबतीत हा प्रकार घडलेला नाही, याची आम्हाला कल्पना आहे. टिकटॉकवरील बंदीची बातमी पाहून माझ्या दोन्ही बायका ढसाढसा रडल्या. या निर्णयामुळे आमच्यासारखेच लाखो जण दुखावले गेले आहेत,’ असं पवार म्हणाले. आता यूट्यूबकडे जाण्याचा निर्णय घेतल्याचंही त्यांनी सांगितलं.

दिनेश पवार नव्वदच्या दशकातील बॉलिवूड चित्रपटांमधील गाण्यांवर नृत्य करून टिकटॉक व्हिडीओ तयार करायचे. या व्हिडीओमध्ये त्यांच्या दोन्ही पत्नीदेखील असायच्या. यामधून त्यांनी ३० लाखांची कमाई केल्याची चर्चा होती. मात्र ही बाब पवार यांनी फेटाळली. आम्हाला त्यातून पैसे मिळायचे नाहीत. मात्र आमची प्रसिद्धीची इच्छा पूर्ण झाली, असं पवार यांनी सांगितलं.