शीर्षक बघून गोंधळलात ना? जर तुम्ही प्रवास करत असणाऱ्या विमानात जर कबूतर उडू लागली तर कसे वाटेल,विश्वास बसत नाही आहे ना? असच काहीस घडलंय ‘अहमदाबाद-जयपूर’ हा प्रवास विमानाने करणाऱ्या प्रवाशांसोबत!
अहमदाबाद वरून जयपूर जाणाऱ्या विमानाला आकाशात झेप घेण्यासाठी अवघे काही मिनिटे बाकी असतांना विमानाच्या सामानाच्या कप्प्यातून दोन कबुतरं अचानक बाहेर आली, प्रवाशांनी त्या कबुतरापासून स्वतःला वाचवण्यासाठी तारेवरची कसरत केली. सद्या कबुतरांचा हा विडिओ प्रचंड वायरल झाला असून, लोकांची झालेली फजिती बघून नेटकरी मंडळींमध्ये चांगलाच हशा पिकला आहे.अहमदाबाद-जयपूर जाणारे हे विमान गो एअर कंपनीचे होते, ह्या कबूतरांमुळे या विमानफेरीला मात्र तब्बल अर्धा तास उशीर झाला.
बघा संपूर्ण विडिओ
“Do Kabootar plane ke andar 🐦🐦” https://twitter.com/i/events/1233678947646181377