Home मनोरंजन अबब विराट कोहली आणि प्रियांका चोप्रा इंस्टाग्रामच्या एका पोस्ट वरून कमावतात २.५...

अबब विराट कोहली आणि प्रियांका चोप्रा इंस्टाग्रामच्या एका पोस्ट वरून कमावतात २.५ कोटी रुपये!

0

२१ व्या शतकातील नवीन क्रांती म्हणून सोशल मीडियाला ओळखले जाते, लाखो लोकांचे हे रोजगाराचे साधन बनले आहे तर काहींचे विचार व्यक्त करण्याचे व्यासपीठ. पण क्रिकेट फलंदाज विराट कोहली आणि बॉलीवूड आणि हॉलिवूड मधील अभिनेत्री प्रियांका चोप्रा यांच्या इंस्टाग्रामच्या एका पोस्ट वरील कमाई पाहून अनेकांना भोवळ येते.

इंस्टाग्रामच्या रिच लिस्ट ने एक यादी जाहीर केली असून यामध्ये जगभरात इंस्टाग्रामच्या माध्यमातून कोण किती पैसे कमवत आहे याची माहिती देण्यात आली आहे. या यादीमध्ये पहिल्या २० नावांमध्ये एकही भारतीय नाही तर २६ व्या स्थानावर विराट कोहली तर २८व्या स्थानावर प्रियांका चोप्रा आहे. अमेरिकन कॅनडियन’ अभिनेता ड्वेन जॉनसनला यादीत पहिले स्थान आहे. तो एका ‘पोस्ट’च्या माध्यमातून ७.६० कोटी रुपये कमावतो. कोहलीचे ‘इंस्टाग्राम’वर ६४.२ दशलक्ष फॉलोअर्स’ आहेत आणि तो एका पोस्टमधून जवळपास २.२१ कोटी रुपये कमावतो. दुसरीकडे प्रियांका चोप्राचे ‘इंस्टाग्राम’वर ५४.३० दशलक्ष फॉलोअर्स’ आहेत आणि ती जवळपास २.१८ कोटी रुपये प्रत्येक पोस्टसाठी कमावते.

कसा मिळतो यांना इतका पैसा?

जर विराट कोहलीचे ६४ दशलक्ष ‘पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत, जर त्याने ‘इंस्टाग्राम’वर कोणत्याही प्रोडक्टचा प्रचार केला तर, ते ‘प्रोडक्ट’ थेट ६४ दशलक्ष लोकांपर्यंत पोहोचेल.त्यामुळे जाहिरातीचा हा एक प्रकार आहे. ज्यामध्ये ‘सेलिब्रिटी इंफ्लूएन्स’ ‘मार्केटिंग’द्वारे ते उत्पादन खरेदी किंवा ग्राहकांच्या पसंतीस उतरते यामध्ये ‘फिचर्स पोस्ट’चे पैसे मिळतात. ‘इंस्टाग्राम’ यामध्ये ‘सेलिब्रिटीं’ना पैसे देत नाही तर त्या ‘ब्रँड’कडून पैसे दिले जातात ज्याला हे ‘सेलिब्रिटी प्रमोट’ करतात.

असे असले तरी सोशल मीडिया ही एक दुधारी तलवार असून टिक टॉक बंदी नंतर यावरून सेलेब्रिटी बनलेल्या लोकांच्या आत्महत्या सत्र सुरू झाले आहे, कथितरित्या डिप्रेशनमुळे दोन महिन्यात आणखी एका टिक टॉक स्टारने आत्महत्या केली आहे. काही दिवसांपूर्वी टिक टॉक स्टार सिया कक्करने आत्महत्या करत आपली जीवनयात्रा संपवली होती. आता टिक टॉक स्टार संध्या चौहान हिने आत्महत्या केली.दिल्लीच्या ग्रीन पार्क कॉलनीत राहणारी संध्या दिल्ली युनिव्हर्सिटीची विद्यार्थीनी होती. केवळ वयाच्या १८व्या वर्षी तिने आत्महत्या केली. पोलिसांनी कुठलीही सुसाइड नोट न सापडल्याने संध्याने इतके टोकाचे पाऊल का उचलावे, असा प्रश्न पडला आहे.