Home मनोरंजन आठ दिवसांतच “उसका टाइम आगया”;’गली बॉय’ १०० कोटी क्लबच्या उंबरठ्यावर.

आठ दिवसांतच “उसका टाइम आगया”;’गली बॉय’ १०० कोटी क्लबच्या उंबरठ्यावर.

0

प्राईम नेटवर्क : ‘अपना टाइम आयेगा’ अस म्हणत रणवीर सिंगने अवघ्या तरुणाईला वेड लावलं आहे. सध्या चर्चेत असलेला रणवीर सिंगचा “गली बॉय” चा टाइम आठ दिवसांतच आला आहे. प्रदर्शनानंतर आठच दिवसांत ‘गली बॉय’नं बॉक्सऑफिसवर ९९ कोटींची कमाई केली आहे. बॉलिवूडमधील प्रतिष्ठेच्या १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्रीकरण्यासाठी या चित्रपटाला आता केवळ १ कोटींची गरज आहे.

बॉक्सऑफिसइंडिया.कॉमनं ही माहिती दिली आहे. त्यानुसार, पहिले चार दिवस ‘गली बॉय’ला तुडुंब प्रतिसाद मिळाला. हळूहळू हा प्रतिसाद थंडावला असला तरी प्रदर्शनानंतरच्या आठव्या दिवशी, शुक्रवारी चित्रपटानं ५ कोटींची कमाई केली. त्यामुळं एकूण कमाईचा आकडा ९९ कोटींवर पोहोचला आहे. त्यामुळं ‘गली बॉय’ १०० कोटींच्या क्लबमध्ये जाणार हे जवळपास निश्चित आहे.

‘सिम्बा’नंतर रणवीरसाठी हे दुसरं मोठं यश आहे. झोया अख्तर दिग्दर्शित ‘गली बॉय’ ही गरिबीत वाढलेल्या एका मुलाची गोष्ट आहे. ‘रॅपर’ बनण्याचं या मुलाचं स्वप्न आहे. ‘स्ट्रीट रॅपिंग’च्या माध्यमातून त्याला संगीत जगतात नाव कमवायचं आहे. त्याच्या या प्रवासात काय अडचणी येतात व तो शेवटी कसं यश मिळवतो याचं सुंदर चित्रण यात आहे.विजय मौर्यचे उत्तम डायलोग यात पहायला मिळतील. अभिनेत्री आलिया भटची यात प्रमुख भूमिका आहे. तरुण प्रेक्षकांचा चित्रपटाला तुफान प्रतिसाद मिळत आहे.