Home अर्थजगत २००० च्या नोटा बंद होणार? वाचा काय म्हणाल्या निर्मला सीतारामन

२००० च्या नोटा बंद होणार? वाचा काय म्हणाल्या निर्मला सीतारामन

0

‘देशाच्या ATM मधून तुरळक होत चाललेल्या २००० च्या नोटा बंद करण्याचा सरकारने कुठलाही आदेश बँकांना दिलेला नाही’ असं वक्तव्य देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिले आहे. पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना त्या म्हणाल्या, ” माझ्या माहितीप्रमाणे असा कुठलाही आदेश आम्ही दिलेला नाही” असे त्या यावेळी म्हणाल्या.

काही दिवसांपूर्वी इंडियन बँकेने ३ हजार atm मधून २००० च्या नोटा परत बोलावण्याचा निर्णय घेतला होता. ग्राहक २००० चे सुट्टे पैसे करण्यासाठी बँकेतच येत गर्दी करीत असल्याने बँकेने हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे. 

नोव्हेंबर २०१६ मध्ये निश्चलणीकरण करतेवेळी ₹२००० च्या नोटेचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर ATM मध्ये या नोटांचा पूर आला होता. पण या नोटा चलनात आणताना ग्राहकांना नाहक मनस्ताप होत होता. ₹२००० चे सुट्टे मिळणे आजही अवघड काम आहे. त्यातच बँकांनी घेतलेला हा निर्णय दिलासा देणारा असला तरी हा निर्णय सरकारने दिला आहे की नाही हे स्पष्ट होणे अद्याप बाकी आहे. निर्मला सीतारामन यांच्या मते त्यांनी असा कुठलाही आदेश बँकांना दिलेला नाही, मग सरकार बँकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून हा निर्णय राबवत आहे का हे बघणे महत्वाचे ठरणार आहे!