Home अर्थजगत तब्बल ६ दिवस बँका असणार बंद! ATM सुद्धा पडणार ओसाड!!

तब्बल ६ दिवस बँका असणार बंद! ATM सुद्धा पडणार ओसाड!!

0

बँक कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाने राज्य आर्थिक पाहणी आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुद्धा माघार घेतली नाही, पण तरीसुद्धा सरकार आपल्या मागण्या मान्य करत नसल्याने परत एकदा हे कर्मचारी संपाच्या पावित्र्यात आहेत.
लोकसत्ताने दिलेल्या माहितीनुसार मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात बँक कर्मचारी ३ दिवस संप पुकारणार आहेत. ११ मार्च ते १३ मार्च पर्यंत बँका बंद राहतील. पण १४ मार्चला दुसरा शनिवार तर १५ ला रविवार असल्यामुळे व १० ला होळी निमित्त तब्बल ६ दिवस बंद राहण्याची नामुष्की आहे. यामुळे नागरिकांचे अतोनात हाल होणार आहेत तर ATM सुद्धा बिना कॅशचे ओसाड पडलेले असतील.


बँक कर्मचारी फेडरेशन ऑफ इंडिया (BEFI) आणि ऑल इंडिया बँक कर्मचारी संघटना (AIBEA) यांच्याकडून संपाला दुजोरा देण्यात आला आहे. आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर सर्व राष्ट्रीयकृत बँकातील कर्मचाऱ्यांकडून ११ मार्च ते १३ मार्च २०२० दरम्यान संप पुकारण्यात येईल. कामाचं समान वेतन, पाच दिवसांचा आठवडा, कामाची निर्धारित वेळ, पेन्शन अशा विविध मागण्यांसाठी कर्मचारी संघटनांनी पुन्हा एकदा संप पुकारला आहे.