Home अर्थजगत नोव्हेंबर महिन्यात तब्बल इतके दिवस बँका बंद राहणार; त्याआधी उरकून घ्या महत्वाची...

नोव्हेंबर महिन्यात तब्बल इतके दिवस बँका बंद राहणार; त्याआधी उरकून घ्या महत्वाची कामे

0

नोव्हेंबर महिना म्हणजे सणासुदीचा महिना. दिवाळी, दसरा सारखे मोठमोठे सण याच महिन्यात असतात. यंदाची दिवाळी देखील नोव्हेंबर महिन्यात असून त्यामुळे या काळात बँकांना अनेक दिवस सुट्ट्या असणार आहेत. तसेच नोव्हेंबर मध्ये इतरही काही छोट्या १-२ दिवसांच्या सुट्ट्याही आहेत. अशा मिळून एकूण १५ दिवस सुट्ट्या असल्याने नोव्हेंबर मध्ये तब्बल १५ दिवस बँका बंद असणार आहेत. रिसर्व बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर ही माहिती देण्यात आली. त्यामुळे बँकांशी संबंधित आपली महत्वाची कामे लवकर उरकून घेण्याचे आवाहन आरबीआयने नागरिकांना केले आहे.
रिसर्व बँकेच्या नोटिसनुसार पुढील तारखांना बँका बंद राहतील:

१ नोव्हेंबर

६ नोव्हेंबर

८ नोव्हेंबर

१४ नोव्हेंबर

१५ नोव्हेंबर

१६ नोव्हेंबर

१७ नोव्हेंबर

१८ नोव्हेंबर

२० नोव्हेंबर

२१ नोव्हेंबर

२२ नोव्हेंबर

२३ नोव्हेंबर

२८ नोव्हेंबर

२९ नोव्हेंबर

३० नोव्हेंबर

या तारखांची नोंद घेऊन नागरिकांनी आपली महत्वाची कामे लवकर उरकून घ्यावी. तसेच बँका एका राज्यात बंद असतांना दुसऱ्या राज्यात उघड्या असण्याची शक्यता असल्याचेही आरबीआयने सांगितले आहे.