Home अर्थजगत “कोरोना नंतरच्या काळात मोठे आर्थिक संकट येणार; तयारी ठेवा!”- शरद पवार

“कोरोना नंतरच्या काळात मोठे आर्थिक संकट येणार; तयारी ठेवा!”- शरद पवार

0

“कोरोनाशी लढा हा तर आपण देणारच आहोय, पण  त्यानंतरच जो येणारा काळ आहे हा आर्थिकदृष्टीने अत्यंत कठीण राहणार आहे. येणारे जे काही दिवस आहेत ते अत्यन्त काटकसरीने काढावे लागतील, बचत करावी लागेल, विकासदर दोन टक्क्यांपर्यंत येईल! असे सांगितले जात आहे. तेव्हा त्यावर कशी मात करायची याचा विचार आत्तापासून करण्याची गरज आहे” असे स्पष्ट मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मांडले आहे.

पवार हे काल फेसबुकच्या माध्यमातून व्हिडिओ संवाद साधत होते. त्यांनी जनतेच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. तेव्हा बोलत असतांना त्यांनी पुढील काळासाठी तयारी करायला सांगितले, विकासदर २% राहणार असल्याने आपण वायफळ खर्च पूर्ण बंद करून काटकसर करायला हवि आणि उत्पादकता कशी वाढवता येईल याचा विचार करायला हवा.

“आपले राज्य सरकार खूप चांगले काम करत आहे पण त्यांच्या सूचनांचे पालन केले गेले नाही तर लॉकडाउन चा अवधी वाढवावा लागू शकतो. आज अनेक लोक परिस्तिथी चा फायदा घेऊन नफेखोरी करत आहेत पण हा काळ असल्या गोष्टींचा नसून मदत करण्याचा आहे. जागोजागी असणारी खासगी दवाखाने, ओपीडी बंद असून ही फार गंभीर बाब आहे. जे डॉक्टर अहोरात्र मेहनत करून लढा देत आहेत त्यांचे आभार” असेही पवार म्हणाले.

महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनासंदर्भात जनतेला घरी थांबण्याचे आवाहन केले त्यास एक आठवडा पूर्ण…

Publiée par Sharad Pawar sur Dimanche 29 mars 2020