Home अर्थजगत लोकांच्या खात्यात खर्चासाठी पैसे जमा करा,खर्चासाठी पैसा असेल तरच अर्थव्यवस्था वाचेल: नोबेल...

लोकांच्या खात्यात खर्चासाठी पैसे जमा करा,खर्चासाठी पैसा असेल तरच अर्थव्यवस्था वाचेल: नोबेल विजेते अभिजित बॅनर्जी

0

अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते भारतीय अर्थतज्ज्ञ अभिजित बॅनर्जी यांची आज काँग्रेस चे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मुलाखत घेतली या मुलाखतीदरम्यान ते कोरोना व्हायरस मुळे होणाऱ्या गंभीर आर्थिक परिणामा संबंधी बोलत होते.

“जास्तीत जास्त खर्च होणे हा अर्थव्यवस्था वाचवण्याचा सर्वात सोपा उपाय आहे, आणि यासाठी देशातील ६०% नागरिकांच्या खात्यात पैसे जमा होणे खूप फायद्याचे ठरेल” ,असे डॉ बॅनर्जी म्हणाले.

“आपण काही चांगल्या उपाययोजना करत आहोत, जसे की कर्जावरचे हफ्ते काही काळासाठी लांबणीवर टाकले आहेत, पण त्यापेक्षाही सरकारने ही कर्जे या तिमाहिसाठी पूर्णतः माफ करायला हवीत”,असे मत त्यांनी यावेळी दिले.

“सरकारने आधार कार्ड हे रेशन कार्ड ला जोडून खूप चांगले काम केलेले आहे, परंतु या अडचणीच्या काळामध्ये सरकारने ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाहीत त्यांच्यासाठी तात्पुरती रेशन कार्ड सेवा द्यायला हवी याखेरीज कोरोना व्हायरस च्या प्रकोपानंतर जी दिवाळखोरी निघणार आहे त्याचासुद्धा विचार करायला हवा. भारत सरकार हे नोकऱ्या वाचवण्यासाठी अतिशय बुद्धीचातुर्याने प्रयत्न करेल असा माझा ठाम विश्वास आहे”, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.