Home अर्थजगत दिवाळी नंतर सर्वसामान्यांचं निघणार दिवाळं : सलग तिसऱ्या महिन्यात गॅस दरात वाढ

दिवाळी नंतर सर्वसामान्यांचं निघणार दिवाळं : सलग तिसऱ्या महिन्यात गॅस दरात वाढ

0

आर्थिक मंदी नंतर सामान्य जनतेची दिवाळी आनंदात पडली मात्र आता सलग तिसऱ्या महिन्यात घरगुती गॅसचे दर वाढणार आहेत. मीडिया न्यूज नुसार गॅस कंपन्यांनी पुन्हा एकदा एलपीजीच्या किमतीत वाढ केली असून सर्वसामान्यांना याची चांगलीच झळ बसणार आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने विनाअनुदानित १४.२ किलोच्या अर्थात घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ७६.५ रुपयांची वाढ केली आहे तर व्यावसायिक गॅस सिलिंडर अर्थात १९ किलोच्या दरातही ११९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

एक महिन्यापूर्वी आजच्याच दिवशी गॅसचे दर वाढवणात आले होते. त्याचीच आता पुनरावृत्ती होताना दिसत आहे. आर्थिक मंदीच्या कचाट्यात अडकलेलं आणि दिवाळीनंतर ठणठणीत खिसे रिकामे झाल्यामुळे परिणामी सर्वसामान्य आणि कुटुंबीयांचं बजेट कोलमडणार यात शंका नाही.