Home अर्थजगत १० रुपयांच्या नोटेचे मिळवा पूर्ण १३५५ रुपये ६२ पैसे : इबेची भन्नाट...

१० रुपयांच्या नोटेचे मिळवा पूर्ण १३५५ रुपये ६२ पैसे : इबेची भन्नाट ऑफर…

0

हे वाचल्यावर तुम्हाला सुरुवातीला मुळीच खरं वाटणार नाही कारण असे प्रकार केवळ लॉटरीत पाहायला मिळतात: प्रत्यक्षात नाही. मात्र तसे काहीही नाही. तुम्ही जे वाचताय ते अगदी १००℅ खरं आहे. भारतीय चलनात वापरली जात असलेली १० रुपयांची नोट तुम्ही भाग्यवान असाल तर तुम्हाला १३५५ रुपये मिळवून देऊ शकते. त्याकरिता तुम्हाला ईबे डॉट कॉम या संकेतस्थळावर जावे लागेल. कारण तेथेच १० रुपयाच्या नोटेची विक्री केली जात आहे. आता कुठल्याही गोष्टीचा मोठा मोबदला सहज सहजी मिळत नाही. त्यासाठी अर्थातच काही अटी व नियमांना आपली नोट पात्र असायला हवी.

तुमची नोट नवी असायला हवी आणि महत्वाचं म्हणजे तिच्यावर ऊर्जित पटेल यांची सही हवी. ऊर्जित पटेल रिझर्व बँकेचे माजी गव्हर्नर आहेत. याच नोटेची तुम्हाला ऑनलाईन विक्री करता येईल आणि त्याबदल्यात तुम्हाला पूर्ण १३५५ रुपये ६२ पैसे मिळतील. आहे की नाही भन्नाट ऑफर! या ईबे वेबसाईटवर यापूर्वी देखील केवळ १ रुपया आणि १०० रुपयांच्या नोटा अशाच महाग विकल्या गेल्या आहेत. मग घ्या संधीचा लाभ आणि कमवा पैसे…