Home अर्थजगत खुशखबर! सोन्याच्या किमतीत कमालीची घसरण

खुशखबर! सोन्याच्या किमतीत कमालीची घसरण

0

एकीकडे निवडणुकांची रेलचेल तर दुसरीकडे उत्सवाची सुरुवात, अशात बाजारपेठा अगदी लख्ख भरल्या आहेत. यंदा दसऱ्याला सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी खूप चांगली बातमी आहे. या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किमतीत कमालीची घसरण झाली आहे. दिल्लीत १० ग्रॅम सोन्याची किंमत २४० रुपयांनी घसरली आहे. तर १ किलोग्रॅम चांदीची किंमत ७७५ रुपयांनी स्वस्त झाली आहे.

मीडिया न्यूज नुसार आंतरराष्ट्रीय बाजाराचा प्रभाव पडल्यानं सोन्याच्या किमती कमी झाल्या आहेत. सोन्याचा नवा भाव २४० रुपयांनी कमी होऊन ३८,५३० रुपये प्रति १० ग्रॅम इतका झाला आहे. उत्सवाच्या मुहूर्तावर बचत म्हणून सोन्याची खरेदी करणाऱ्यांसाठी ही चांगलीच खूषखबर आहे.