
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आज तिसऱ्यांदा रिसर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी अर्थव्यवस्था विषयक घोषणा केल्या. रेपो रेट मध्ये 40 बेस पॉईंट ने कपात करत तो 4% वर करण्यात आला आहे तसेच कर्ज फेडण्याचा हफ्ता फेडण्याचा कालावधी अजून ३ महिन्याने वाढवण्यात आला आहे, त्यामुळे आता कर्ज फेडीसाठी ऑगस्ट ३१ पर्यंतचा कालावधी मिळाला आहे.
ते पुढे म्हणाले की, २०२०-२१ मध्ये जीडीपी वाढ नकारात्मक प्रदेशात होईल. सहा सदस्यीय चलनविषयक धोरण समितीने ५.१ ने व्याजदरामध्ये कपात करण्याच्या बाजूने मतदान केले. भारतातील मागणी घटत आहे, वीज, पेट्रोलियम उत्पादनांचा वापर कमी होत आहे, खासगी वापर कमी होत आहे. कोविड-१९ प्रादुर्भावामुळे खासगी वापराला सर्वाधिक फटका बसला आहे. गुंतवणूकीची मागणी थांबली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याच्या दरम्यान सुस्त आर्थिक घडामोडींमुळे सरकारच्या महसुलावर वाईट परिणाम झाला आहे.
रेपो व रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय?
देशातील बँका जेव्हा रिझर्व्ह बँकेकडून अल्प मुदतीचे कर्ज घेत असतात त्यावेळी जो दर रिझर्व्ह बँक आकारत असते त्याला रेपो रेट म्हणतात. तर ज्यावेळी बँका आपल्याकडील अधिकचा निधी रिझर्व्ह बँकेकडे अल्पमुदतीसाठी जमा करते, त्यावेळी जो व्याजदर आरबीआय देते त्याला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात.