Home अर्थजगत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या कडून अर्थसंकल्प सादर, पहा काय स्वस्त ? काय...

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या कडून अर्थसंकल्प सादर, पहा काय स्वस्त ? काय महाग ?

0

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला आहे. तब्बल दीड तास निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पाचं वाचन केलं. सीतारामन यांनी आज महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. अर्थमंत्री सीतारामन यांचा अर्थसंकल्प हा चौथा होता, तर मोदी सरकारचा १० वा अर्थसंकल्प होता. या वेळी देखीलअर्थमंत्र्यांनी पेपर शिवाय अर्थसंकल्प मांडला. पाहुयात या अर्थसंकल्पातील महत्वपूर्ण घोषणा

 • कर चुकवणाऱ्यांसाठी कर चुकवताना छापा मारल्यास सर्व सपंत्ती जप्त
 • २०२२-२०२३ आयकरात कोणता ही बदल नाही
 • जानेवारी २०२२ मध्ये १ लाख ४० हजार ९८६ कोटीचं जीएसटी संकलन
 • स्टार्टअप साठी २०२३ पर्यंत करसवलत दिली जाईल अशी घोषणा अर्थमंत्र्यां कडून करण्यात आली
 • राज्यांच्या अर्थव्यवस्थेसाठी १ लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा
 • सहकार क्षेत्राला १८ टक्क्यांनुसार कर भरावा लागतो. तो १५ टक्क्यावंर आणण्यात आला
 • आयकर रिटर्न फाईल करताना चूक झाल्यास दिलासा
 • आरबीआय चं डिजिटल चलन येणार
 • भांडवली खर्च ३५.४ टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय
 • पोस्ट ऑफिस मध्येही आता ऑनलाइन हस्तांतरण शक्य
 • देशात २१ मानसिक समस्या समुपदेशन केंद्र सुरु करणार
 • एक उत्पादन, एक रेल्वे स्टेशन ही योजना लागू करणार
 • किसान ड्रोन्सचा वापर शेतीमध्ये केला जाणार
 • विद्यार्थ्यांच्या विकासासाठी पहिली ते बारावीसाठी टीव्ही चॅनेल
 • ३.८ कोटी घरांमध्ये नळाचं पाणी पोचवण्यासाठी ६० हजार कोटी
 • पंतप्रधान आवास योजनेसाठी ४८ हजार कोटींची नव्याने तरतूद
 • कृषी विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात नैसर्गिक शेती, झिरो बजेट शेतीचा समावेश
 • देशात मेट्रो ट्रेनचं जाळं उभं करण्यासाठी प्रोत्साहन देणार

पहा अर्थसंकल्प 2022 लाईव्ह