Home अर्थजगत रिझर्व्ह बँकेने केली मोठी घोषणा : NEFT वर आता चार्जेस लागणार नाही

रिझर्व्ह बँकेने केली मोठी घोषणा : NEFT वर आता चार्जेस लागणार नाही

0

रिझर्व्ह बँकेने एक मोठी घोषणा केली आहे. या घोषणेने सामान्य नागरिक नक्कीच सुखावणार. कारण आता सेव्हिंग अकाऊंट अर्थात बचत खात्यांमधून ऑनलाइन व्यवहार करताना NEFT चार्जेस लागणार नाही. सदर नियम 1 जानेवारी 2020 पर्यंत लागू होईल अशी माहिती मिळत आहे. म्हणजेच 1 जानेवारी 2020 पासून NEFT च्या माध्यमातून व्यवहार केलात तर त्यावर कुठल्याही प्रकारचे चार्जेस लागणार नाहीत.

ऑनलाइन व्यवहार करताना NEFT आणि RTGS चा वापर केला जातो व या दोन्ही यंत्रणांवर रिझर्व्ह बँकेचं नियंत्रण असतं. सध्या NEFT वर ठराविक रकमेवर ठराविक रक्कम चार्ज केली जाते मात्र या घोषणेने सामान्य माणूस सुखावणार आहे.