Home अर्थजगत अर्थसंकल्पात ठरल्याप्रमाणे शेतकऱ्यांसाठी ‘किसान रेल’ची तयारी जोमात सुरू; असे असतील फायदे

अर्थसंकल्पात ठरल्याप्रमाणे शेतकऱ्यांसाठी ‘किसान रेल’ची तयारी जोमात सुरू; असे असतील फायदे

0

नुकत्याच समोर आलेल्या २०२० च्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या विकासासाठी विशेष योजनांची तरतूद करण्यात आली आहे. रेल्वे मंत्रालयाने शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढावे व शेतमालाला योग्य हमीभाव मिळावा म्हणून ‘किसान रेल’ ही योजना मांडली असून तिची अंमलबजावणीही चालू केली आहे असे मीडिया न्यूजवरून समजते.

लोकमतच्या रिपोर्टनुसार या योजनेच्या अंमलबजावणीसाठी कपूरथ येथील रेल्वे कारखान्यातून रेल्वे मंत्रालयाने नऊ रेफ्रिजरेटर डबे खरेदी केले आहेत. या एका डब्याची क्षमता १७ टन इतकी आहे. भविष्यात असे ९८ रेफ्रिजरेटर डबे खरेदी करण्याची रेल्वे मंत्रालयाची योजना असून भाजीपाला, फळं, दूध, मांस, मासे असा नाशिवंत असलेला माल ग्रामीण भागातून शहरात लवकर पोहचवण्यासाठी या रेफ्रिजरेटर पार्सल व्हॅन अर्थात रेफ्रिजरेटर डब्यांचा उपयोग होणार आहे. या डब्यांतून माल नेणाऱ्यांसाठी मालाचं भाडं सामान्य भाड्यापेक्षा दीडपट अधिक असणार आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार फळं आणि भाजीपाल्याच्या लोडिंग आणि अनलोडिंगसाठी देशभरात लासलगाव, गाझिपुर, न्यू आझादपूर, राजाचा तलाव या चार ठिकाणी कार्गो सेंटर्स स्थापन करण्यात येणार आहेत. याशिवाय सोनीपत येथे १६.४० एकरांमध्ये एक ऍग्रीकल्चर लॉजीस्टिक सेंटरही बनवण्यात येणार आहे.