Home अर्थजगत लॉकडाऊनमुळे राखी विक्रेत्यांवर येणार मोठे आर्थिक संकट

लॉकडाऊनमुळे राखी विक्रेत्यांवर येणार मोठे आर्थिक संकट

0

येत्या ३ ऑगस्टला अर्थात सोमवारी रक्षाबंधन आहे. मात्र लॉकडाऊन चालू असल्याने देशभरातील बरेच लोक हा सण साजरा करू शकणार नाहीत. त्यामुळे राख्यांच्या खरेदीवर मोठा परिणाम हिणार असल्याचे दिसते. तसेच राखी विक्रेत्यांना यावेळी बाजारात स्वतंत्र स्टॉल्स लावणेही शक्य होणार नाही. त्यामुळे राखी विक्रेत्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवण्याची शक्यता आहे.

दरवर्षी रक्षाबंधनाच्या जवळपास २ आठवडे आधीच बाजारात राख्यांचे मोठमोठे स्टॉल्स लागतात, बहिणी मोठ्या उत्साहाने बाहेर पडून राख्यांची खरेदी करतात. मात्र यंदा लॉकडाऊनमुळे हे काहीच शक्य नसल्याने इतर गोष्टींप्रमाणे रक्षाबंधनही ऑनलाइनच साजरे केले जाऊ शकते. केवळ राखी विक्रेत्यांवरच नाही तर महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर देखील याचा परिणाम होईल. राख्यांच्या विक्रीतून कितीतरी कोटींची उलाढाल महाराष्ट्रात होते. यावर आता पाणी पडणार असल्याचे मीडिया न्यूज मध्ये सांगण्यात येत आहे.