Home अर्थजगत सोने चांदीच्या भावात पुन्हा झाली मोठी घसरण; जाणून घ्या नवे दर

सोने चांदीच्या भावात पुन्हा झाली मोठी घसरण; जाणून घ्या नवे दर

0

काही आठवड्यांपासून सोने व चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात चढउतार होत असलेली आढळून येत आहे. या आठवड्यातही मंगळवारी व बुधवरीही भावात मोठी घसरण झाली. आज चांदीचे दर प्रति किलो ६२ हजारांवरून ६१ हजारांवर आला असून सोन्याचे दर प्रति किलो ५१,३०० वरून ५०,३०० वर आले आहेत. मध्ये पितृपक्षाच्या काळात सोन्याचांदीच्या भावात वाढ झाली होती. मात्र आता अधिक महिना सुरू झाल्यापासून भाव पुन्हा खाली येतांना दिसून येत आहेत.

गेल्या महिन्यात २४ ऑगस्टला चांदीचे दर प्रतिकिलो ६६,००० वर आले होते. त्यानंतर या दरात आणखी बरीच घसरण झाली आणि ३१ ऑगस्टला परत वाढ होऊन हा दर ६८,००० वर गेला. आता परत या दरात मोठी कपात झाली आहे.