Home अर्थजगत येस बँक डबघाईस! रिसर्व्ह बँकेने लादले अनेक निर्बंध

येस बँक डबघाईस! रिसर्व्ह बँकेने लादले अनेक निर्बंध

0

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) गुरुवारी येस बँकेवर निर्बंध लादले. या निर्बंधांमुळे येस बँकेच्या ग्राहकांना मोठाच झटका बसला आहे. येस बँक मोठ्या आर्थिक अडचणीत सापडलेली असून या बँकेवर बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट १९४९ नुसार रिसर्व्ह बँकेने कारवाई केली. या निर्बंधानंतर जर तुम्ही येस बँकेचे ग्राहक असाल तर तुम्हाला बँकेच्या अकाऊंटमधून केवळ ५० हजार रुपयेच काढता येणार आहेत. त्यामुळे या बँकेचे ग्राहक मोठया संकटात पडले असून त्यांनी ATM समोर लांबच लांब रांगा लावल्या आहेत. 

अनेक मोठे कर्जदार दिवाळखोरीत निघाल्याने येस बँक अडचणीत आली. बँकेचा ताळेबंद सक्षम करण्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या वतीने सतत चर्चा सुरू होत्या. पण येस बँकेला खासगी इक्विटीमार्फत भांडवल उभे करण्यात अपयश आल्याने अखेर रिझर्व्ह बँकेने निर्बंध लागू केले.

 काय आहेत ग्राहकांसंबंधी निर्बंध?

(१)तुम्ही फक्त ५०००० पर्यंत ची रक्कम बँकेतून काढू शकता.

(२) एकाच व्यक्तीचे दोन खाते जरी असले तरी सुद्धा एकूण रक्कम ₹५०००० पर्यंतच पैसे निघू शकतील

(३) डिमांड ड्राफ्ट व आर्टिजीएस या दोहोंची सुद्धा मर्यादा ₹५०००० च ठेवण्यात आली आहे.

हे सर्व निर्बंध ३ एप्रिल २०२० पर्यंत लागू असतील असे येस बँकेच्या वतीने सांगितले आहे. येस बँकेचे ऍडमिन प्रशांत कुमार यांनी ग्राहकांना कुठलीही काळजी न करण्याचे आवाहन केले आहे.