Home अर्थजगत शेअर्समधील घसरणीमुळे रिलायन्स कंपनीचे एकाच झटक्यात ६८,०९३ कोटींचे नुकसान

शेअर्समधील घसरणीमुळे रिलायन्स कंपनीचे एकाच झटक्यात ६८,०९३ कोटींचे नुकसान

0

भारतातील सर्वाधिक बाजारमूल्य असलेली कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे शेअर्स आज अर्थात २ नोव्हेंबरला मोठ्या प्रमाणात घसरले असून यामुळे कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. लोकमतच्या मीडिया न्यूजनुसार रिलायन्सचे शेअर्स तब्बल ६ टक्क्यांनी घसरले असून यामुळे मोठे आर्थिक नुकसान कंपनीला झेलावे लागणार आहे.

सप्टेंबरच्या तिमाहीत कंपनीच्या नफ्यात १५ टक्क्यांनी घट झाली. याचा परिणाम शेअर्स वर झाला असून BSE मध्ये ५.५४ टक्क्यांनी तर NSE मध्ये ५.५७ टक्क्यांनी कंपनीचे शेअर्स घटले आहेत. परिणामी कंपनीचे बाजारमूल्य देखील घटले असून ६८,०९३ कोटींनी कमी झाले आहे. यामुळे कंपनीचे बाजारमूल्य आता १३,२१,३०२ कोटी रुपये इतके झाले. याशिवाय कंपनीचे एकंदरीत उत्पन्न यंदा घसरले असल्याचे मीडिया न्यूजमध्ये सांगण्यात येत आहे. लोकडाऊनचा परिणाम रिलायन्स सारख्या मोठ्या कंपन्यांवरही होतांना दिसून येत आहे.