Home अर्थजगत रॉबर्ट वाड्रा यांची कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त.

रॉबर्ट वाड्रा यांची कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त.

0

प्राईम नेटवर्क: सक्तवसुली संचलनालयाने सुरू केलेल्या चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या रॉबर्ट वाड्रा यांची कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली असून वाड्रांविरुद्धची ही कारवाई बीकानेर जमीन घोटाळ्यासंदर्भात करण्यात आली आहे.

पीटीआयने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की वाड्रा तसेच या प्रकरणातील अन्य आरोपींची 4.62 कोटी रूपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. वाड्रा यांची स्कायलाईट हॉस्पिटॅलिटी नावाची कंपनी आहे. या कंपनीच्या नावावर असलेली जमीन जप्त करण्यात आली आहे. याशिवाय नवी दिल्लीतील सुखदेव विहार इथली जमीनही जप्त करण्यात आली आहे.

दरम्यान,रॉबर्ट वाड्रानी फेसबूक वर पोस्ट करत “माझ्याकडे लपविण्यासारखे काहीच नव्हते आणि मी निश्चितच कायद्याच्या बाजूने आहे. मी प्रत्येकवेळी सहकार्‍याच्या भूमिकेत होतो आणि असेन.” असे म्हणले आहे.

सक्तवसुली संचलनालयाने 2015 साली या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यावेळच्या तहसीलदारांनी जमीन वाटपामध्ये घोटाळा झाल्याची तक्रार केली होती. बीकानेरमधली ही जमीन हिंदुस्थान-पाकिस्तान सीमेलगत असल्याने त्याचे गांभीर्य अधिक वाढले होते.