Home अर्थजगत “भारताच्या इतिहासातील सर्वात मोठे आर्थिक संकट दारावर”, रघुराम राजन यांचा मोदींना इशारा

“भारताच्या इतिहासातील सर्वात मोठे आर्थिक संकट दारावर”, रघुराम राजन यांचा मोदींना इशारा

0


 भारत स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात मोठ्या आर्थिक संकटाच्या टप्प्यात आहे. सरकारने हे आव्हान पेलण्यासाठी विरोधी पक्षांच्या बरोबरीने तज्ञांची मदत घेतली पाहिजे, असं मत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केलंय.

देशात कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या आव्हानांबद्दल त्यांना खास ब्लॉग लिहिला आहे, यामध्ये त्यांनी सरकारला पुढील संकटाबद्दल सतर्क करण्याचा प्रयत्न केला आहे. रघुराम राजन यांना सरकारला पुढील आर्थिक संकटाबद्दल जागं करण्याचा प्रयत्न केला आहे.


स्वातंत्र्यानंतर भारतासमोरचं हे कदाचित सर्वात मोठं संकट आहे!. २००८-०९ मध्ये आलेल्या जागतिक आर्थिक संकटावेळी मागणीत खूप मोठ्या प्रमाणात घट झाली होती.स्वातंत्र्यानंतर भारतासमोरचं हे कदाचित सर्वात मोठं संकट आहे. २००८-०९ मध्ये आलेल्या जागतिक आर्थिक संकटावेळी मागणीत खूप मोठ्या प्रमाणात घट झाली होती.
पण तेव्हा सर्व कामगार कामावर जात होते आणि कंपन्या इतक्या वर्षांच्या नफ्यामुळे मजबूत होत्या, असं रघुराम राजन यांनी म्हटलं आहे. दरम्यान, सरकारने गरिबांवर खर्च करण्यासाठी प्राथमिकता दिली पाहिजे. गरज नसलेला खर्च टाळला पाहिजे, असं मतही राजन यांनी व्यक्त केलं आहे.