Home अर्थजगत बँक खाते रिकामं झाल्याचा मेसेज आला, करा या गोष्टी आणि मिळवा पैसे...

बँक खाते रिकामं झाल्याचा मेसेज आला, करा या गोष्टी आणि मिळवा पैसे परत.

0

सद्याच्या काळात कोरोनामुळे चोरीचे तसेच अकाउंट हॅकिंग चे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे अनेक लोकांची खाते रिकामी झाल्याची घटना समोर येत आहे. कॅशलेस ट्रान्सझॅक्शन देशात वेगाने वाढत आहे. क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डने ट्रान्सझॅक्शन करण्याचे प्रमाणही वाढलेले आहे. अशातच फसवणूकीची प्रकरणे देखील वाढत आहेत.

जेव्हा एखाद्या बँक ग्राहकाला अचानक असा मेसेज येतो की त्याच्या बँक खात्यातून पैसे काढले गेले आहेत तेव्हा काय करावे हे त्याला समजत नाही.
परंतु असा प्रकार घडल्यास घाबरून जाण्याचे काम नाही. अशा प्रकारामध्ये त्वरीत च तुमच्या बँकेच्या हेल्पलाईन वर कॉल करा त्यांना संबंधित प्रकार सांगा तसेच अकाउंट ट्रान्सझॅक्शन ब्लॉक करा.

तसेच पोलिसांना तक्रार करा.यावेळी आपल्या बँक पासबुकची एक कॉपी जवळ ठेवा. बँकेच्या नोंदीनुसार, आयडी प्रूफ आणि ए़ड्रेस प्रूफची कॉपी ठेवा. या कागदपत्रांसह आपल्या जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये जा. ज्यामुळे पोलिसांनी तपास केल्यानंतर ते योग्य ती कारवाई करतील.