
व्होडाफोन-आयडिया कंपनीचे चेअरमन कुमार मंगलम बिर्ला यांनी शुक्रवारी एक अडचण व्यक्त केली. शासनाने जर कंपनीची मदत केली नाही तर या कंपन्या बंद होतील असं त्यांनी दुःख व्यक्त केलं. एकंदरीत आताव्या कंपनीचे भवितव्य सरकारच्या हातात आहे.
मिडिया रिपोर्ट नुसार सर्वोच्च न्यायालयाने देयके भरण्यासंदर्भात दिलेल्या आदेशामुळे व्होडाफोन- आयडिया कंपनी मोठ्या अडचणीत सापडली आहे. भारतीय टेलिकॉम क्षेत्रातील कंपन्यांनी टेलिकॉम लायसन्स फीच्या रूपात 1.47 लाख कोटी रुपयांची देयके शासनाला भरावीत, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच दिला आहे. परिणामी या आदेशामुळे टेलिकॉम क्षेत्र संकटात सापडले असून मंगल बिर्ला यांनी सरकारकडून मदतीची मागणी केली आहे. व्होडाफोन- आयडियाच्या डोक्यावर सध्या 53,038 कोटींच्या देयके आहेत म्हणून ते जास्त चिंतीत असल्याचं सांगितलं जात आहे.