
कोरोना विषाणू प्रतिबंधक लस ही सप्टेंबरपर्यंत तयार होईल असा दावा आघाडीच्या ब्रिटिश वैज्ञानिकांनी केला आहे, टाइम्स या आंतरराष्ट्रीय वृत्तपत्राने याबद्दल वृत्त दिले आहे.
ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या लसशास्त्राच्या प्राध्यापिका सारा गिलबर्ट यांनी टाइम्स ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की ,” आम्हाला ८०% विश्वास आहे की आम्ही बनवलेली लस मनुष्यांवर यशस्वी होईलचं, या लसीची चाचणी उद्यापासून मानवी शरीरावर सुरू करण्यात येणार, जर सर्व काही ठरवल्या प्रमाणे झाले तर आम्ही नक्कीच यशस्वी होऊत पण असे होईलचं याचं गणित सुद्धा पहावे लागेल”
ब्रिटिश सरकारने ही लस यशस्वी झाल्यास तिचे उत्पादन करण्यासाठी लक्षावधी डॉलर खर्च करायची तयारी दर्शवली आहे. उद्या येणाऱ्या चाचणी नंतर जर परिणाम समाधानकारक असले तर लगेचच या लसीच्या उत्पादनाला सुरवात करण्यात येईल असे सरकारद्वारे स्पष्ट करण्यात आले. या लसीबद्दल एवढा आशावाद करणे चांगले नाही असे अनेक लस बनवणाऱ्या कंपन्यांनी संगीतले आहे, ही लस जरी सप्टेंबर पर्यंत बनवून झाली तरी तिला प्रत्येकापर्यंत पोहोचण्यासाठी किमान एका वर्षाचा कालावधी लागेल असे त्यांचे म्हणणे आहे. सबंध जग कोरोना पासून कसे वाचायचे या चिंतेत असताना ही लस आशेचा किरण घेऊन येऊ शकते हे मात्र नक्की!