Home आरोग्य आता ५ मिनीटात कळणार कोरोना चाचणीचा निकाल: राजेश टोपे

आता ५ मिनीटात कळणार कोरोना चाचणीचा निकाल: राजेश टोपे

0


“कोरोनाबाधितांची तपासणी हा या रोगावर विजय मिळवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा विषय असून आता आपल्याला जलदगती(रॅपिड टेस्टिंगसाठी) मान्यता मिळाली आहे. या टेस्टिंगच्या माध्यमातून ५ मिनिटाच्या आत कोरोना तपासणीचा रिझल्ट कळू शकणार आहे”, अशी माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये कोरोनाच्या तपासणीवर सर्वाधिक भर दिला असून ज्याठिकाणी पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत त्याठिकाणी ड्रोनसारख्या डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर करा अशी सूचना पंतप्रधानांनी दिल्या आहेत”, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

राज्यात डेडिकेटेड हॉस्पिटल असावेत, याबाबत राज्य सरकारने तयारी केली आहे.जिथे रुग्णांची संख्या वाढती आहे तिथे कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. यात कुठल्याही प्रकारची तडजोड करण्यात येणार नाही. जमावबंदीसारख्या अनेक गोष्टींची कडक अंमलबजावणी करण्यात येईल, असंही टोपेंनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना सूचना करताना लॉकडाऊन संपल्यानंतर नागरिक लगोलग गर्दी करणार नाहीत, याबद्दलच्या उपापयोजना आखाव्यात, असं त्यांनी सांगितलं.