
मीडिया रिपोर्ट नुसार येत्या २६ डिसेंबरला अर्थात उद्या सकाळी आठ ते अकरा या वेळेत कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे. यापूर्वी १५ जानेवारी २०१० रोजी देशात कंकणाकृती सूर्यग्रहण दिसले होते. म्हणजे तब्बल १० वर्षां नंतर हे ग्रहण पाहण्याचा स्वभाग्य आपल्याला मिळालं आहे.
कंकणाकृती सूर्यग्रहण ग्रहण news 18 च्या रिपोर्ट नुसार भरतासह नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, भुतान, चीन आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये देखील दिसणार आहे. तुमची जर हे ग्रहण पाहण्याची इच्छा असेल तर आजच बाजारात मायलर फिल्मपासून तयार करण्यात आलेले चष्मे घेऊन या, सूर्याकडून येणाऱ्या प्रखर आणि अतिनील किरणांमुळे ज्याला अल्ट्रा व्हायोलेट देवल म्हणतात. डोळ्यांना इजा होऊ शकते म्हणून सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहू नका. ग्रहणा बाबत कुठल्याही अंधश्रद्धा ठेऊ नका. अनेक लोक भीतीपोटी ग्रहण पाहत नाही मात्र निसर्गाचा हा एक सुदंर खेळ आहे जो पुन्हा पुन्हा पाहायला मिळत नाही म्हणून अंधश्रद्धा सोडा व मनसोक्त सूर्यग्रहण पहा. लक्षात ठेवा उद्या सकाळी आठ ते आकारा दरम्यान!