Home माहितीपूर्ण कोट्यावधी रुपये किमतीच्या दुतोंडी सापाचा गावकऱ्यांनी केला पाहुणचार

कोट्यावधी रुपये किमतीच्या दुतोंडी सापाचा गावकऱ्यांनी केला पाहुणचार

0

अनेक खेड्यागावत अशी मान्यता आहे कि, ‘दोन तोंडाचा साप गुप्तधन शोधण्यासाठी मदत करतो’ याच अंधश्रद्धा व पैशांच्या हव्यासे पोटी लोक या सापाची तस्करी करतात. मीडिया रिपोर्ट नुसार हा दुतोंडी साप कोट्यावधी रुपयांना विकला जातो म्हणून जंगलात राहण्यारे लोक या सापाची तस्करी करतात व परिणामी या सापाचं प्रमाण फारच कमी झालं आहे. हे साप आता फारच दुर्मिळ झाले आहेत, कदाचितच पाहायला मिळतात. असाच हा कोट्यवधी किमतीचा साप पश्चिम बंगालमधील एका गावात आढळला मात्र गावकऱ्यांनी त्याला कुठलाही त्रास न देता त्याचा पाहुणचार केला.

पश्चिम बंगालमधील बेलदा फॉरेस्ट रेंजच्या इकरुखी गावात दोन तोंडाचा साप आढळला हा साप पाहिल्यानंतर गावातील लोकांना आपल्या डोळ्यावर विश्वासच बसेना. गावकर्यांनी सापाला दूध पाजलं तर अनेक लोकांनी सापासोबत फोटो काढण्यासाठी गर्दी केली. गावकरांनी असा साप यापूर्वी कधीहि पहिला नव्हता शेवटी सर्पमित्राला बोलावून सापाला सुरक्षित जंगलात सोडण्यात आले. ग्रामस्थांनी दाखवलेल्या उदांतपणाचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे आणि खेड्यतूनही अंधश्रद्धा काही प्रमाणात का होईना पण कमी होत आहे याचेच हे चिन्ह आहे. असं म्हटलं जातं आहे.