Home महाराष्ट्र हा निर्णय ऐकायला आज बाळासाहेब असायला हवे होते. त्यांना खूप आनंद झाला...

हा निर्णय ऐकायला आज बाळासाहेब असायला हवे होते. त्यांना खूप आनंद झाला असता: राज ठाकरे

0

रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादावर सर्वोच्च न्यायालयानं आज निकाल दिला. गेल्या अनेक दशकांपासून चालू असलेला हा वाद सर्वोच्च न्यायालयाने मार्गी लावला. देशभरात या निर्णयाचं कौतुक केलं जातं असून दोन्ही पक्षांनी हा निर्णय आनंदात मान्य केला आहे. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षाध्यक्ष राज ठाकरे प्रतिक्रिया व्यक्त करतांना म्हणाले की “हा निर्णय ऐकायला आज बाळासाहेब असायला हवे होते. त्यांना खूप आनंद झाला असता.” अशा शब्दात ते ट्विटवर वर व्यक्त झाले. बाळासाहेबांनी देखील अयोध्या प्रकरणात बऱ्याच जबाबदाऱ्या आपल्या खांद्यावर घेतल्या होत्या. अयोध्येला राम मंदीर व्हावं हे त्यांचं स्वप्न होतं. म्हणून कदाचित आज राज ठाकरेंना बाळासाहेबांची आठवण झाली असावी.

“आजचा दिवस अतिशय आनंदाचा आहे. अयोध्येतील राम मंदिरासाठी कारसेवकांनी जे बलिदान केलं, त्याचं आज सार्थक झालं. देशातील बहुसंख्या जनतेच्या भावना व वास्तव लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन व आभार… आता इथे लवकरात लवकर मंदिर उभारण्यात यावं आणि रामराज्य देखील यायला हवं. हा निर्णय ऐकायला आज बाळासाहेब असायला हवे होते. त्यांना खूप आनंद झाला असता.” अशा स्वरूपाचे ट्विट राज ठाकरेंनी केले.