Home आध्यात्मिक विसर्जनासाठी गेलेले १० जण बुडाले, अजूनही शोध सुरूच!

विसर्जनासाठी गेलेले १० जण बुडाले, अजूनही शोध सुरूच!

0

ढोल-ताशांच्या गजरात, डीजेच्या तालावर नाचत अकरा दिवसांच्या गणपतीचे काल राज्यभरात विसर्जन करण्यात आले. विसर्जन मिरवणुका सुरळीत पार पडाव्यात म्हणून महाराष्ट्र पोलिसांनी तसेच वाहतूक विभागाने जागोजागी चोख बंदोबस्त केला होता त्यामुळे बऱ्याच ठिकाणी विसर्जन शांततेत पार पडले. परंतु काही ठिकाणी दुःखद दुर्घटनाही घडल्या.

विसर्जनादरम्यान राज्यभरात १० जण बुडाले अशी बातमी समोर आली आहे. नगर जिल्ह्यात श्रीरामपूर येथे दोघांचा बुडून मृत्यू झाला तर अमरावतीत एका बुडणाऱ्या तरुणाला वाचवण्यासाठी गेलेले इतर तीन बुडाल्याची घटना समोर आली आहे. अमरावतीतील शुकलेश्वर येथे नदीच्या पात्रात विसर्जनासाठी गेलेला असतांना एक तरुण बुडू लागला. हे पाहून तीन तरुणांनी त्याला वाचवण्यासाठी नदीत उड्या टाकल्या. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते तीनही तरुण बुडाले मरण पावले. याशिवाय रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथे तीन आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन तरुण बुडाले असून या पाच तरुणांचा अजूनही शोध सुरू आहे.