Home महाराष्ट्र उस्मानाबादच्या तरुणाला बॉर्डर वर अटक, प्रेयसीला भेटायला निघाला होता पाकिस्तानला!

उस्मानाबादच्या तरुणाला बॉर्डर वर अटक, प्रेयसीला भेटायला निघाला होता पाकिस्तानला!

0

उस्मानाबाद मधील एक २० वर्षीय तरुणाला आज BSF सीमा सुरक्षा दलाने पाकिस्तान सीमेजवळ ताब्यात घेतले आहे. झिशान सिद्धकी असे याचे नाव असून तो त्याच्या कथित प्रेयसीला भेटण्यासाठी सीमा पार करत पाकिस्तानला जाणार होता. उस्मानाबाद ते पाकिस्तान सीमेचे अंतर चक्क त्याने दुचाकीवर पूर्ण केले असल्याची माहिती येत आहे.

सीमा भागात गस्त घालत असताना सीमा सुरक्षा दलाला एक वाळू मध्ये फसलेली दुचाकी दिसली, या दुचाकीच्या नंबर प्लेट वरून महाराष्ट्राची पासिंग असल्याचे त्यांनी उलगडल्यावर आणि गाडीचे इंजिन गरम असल्याचे समजल्यावर त्यांनी त्या गाडीच्या मालकाची शोधाशोध सुरू केली. थोड्या वेळानंतर हा झिशान त्यांना सापडला, त्याची चौकशी केली असता तो त्याच्या प्रेयसीला भेटण्यासाठी पाकिस्तानला जात आहे असे त्याने सांगितले.

लॉकडाऊनच्या काळात जवळपास एक हजार किलोमीटर अंतर दुचाकीवर पार करत हा पाकिस्तानी सीमेपर्यंत कसा पोहोचला याची चौकशी सद्या सुरू असून, सुरवातीचा काही काळ त्याने हे उस्मानाबाद ते नगर अंतर सायकल ने पूर्ण केले आणि अहमदनगर शहरात त्याने दुचाकी घेतली असल्याचे त्याने सांगितले आहे. ही दुचाकी सीमेलगत असलेल्या वाळू मध्ये अडकल्याने तो पुढचा प्रवास तो चालत चालत करत होता.

झिशान हा उस्मानाद येथील मौलवीचा मुलगा असून त्याने काही दिवस अगोदर हैदराबादला अज्ञात ट्रेनिंग घेतले आहे तो तेथून परत आल्यानंतर घरच्यांशी न बोलताच अचानक गायब झाला, तो गायब झाल्याची पोलीस तक्रार त्याच्या वडिलांनी काल दिली आणि पोलिसांनी त्याचा फोन आणि लॅपटॉप ट्रेस केला असता तो पाकिस्तानला निघाला असल्याची शंका आली, BSF शी चौकशी केल्यावर त्यांना त्याची पुष्टी मिळाली. हा तरुण नक्की प्रेयसीला भेटण्यासाठी निघाला होता की कुठल्या आतंकवादी संघटनेस शामिल होणार होता याचा तपास ATS करत आहे.