Home महाराष्ट्र मतदानासाठी २१ ऑक्टोबरला राज्यभरात सुट्टी जाहीर

मतदानासाठी २१ ऑक्टोबरला राज्यभरात सुट्टी जाहीर

0

येत्या २१ ऑक्टोबरला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. मतदानाचा हक्क सर्व नागरिकांना बजावता यावा आणि मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी राज्य सरकारने २१ ऑक्टोबरला सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. या दिवशी महाराष्ट्रातील सर्व बँका, कार्यालये, शाळा, महाविद्यालये यांना सुट्टी असणार आहे असे राज्य सरकारने जाहीर केले.

महाराष्ट्रात विधानसभेच्या २८८ जागांसाठी २१ ऑक्टोबरला निवडणूक लढवण्यात येणार आहे. त्यासाठी आतापर्यंत ८ कोटी ९५ लाख ६२ हजार ७०६ मतदारांची नोंदणी झाली असून एकूण ९५ हजार ४७३ मतदानकेंद्रांवर मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी म्हणून राज्यातील शिक्षकांची तसेच सरकारी कर्मचाऱ्यांची मतदान केंद्रांवर नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे २१ ऑक्टोबरला शाळा तसेच सरकारी कार्यालयांना सुट्टी असणार आहे असे मीडिया न्यूजवरून समजले.