Home महाराष्ट्र प्रतिज्ञापत्रात खुलासा : २९ वर्षांच्या आदित्य ठाकरेंकडे ११ कोटी ३८ लाखांची संपत्ती!

प्रतिज्ञापत्रात खुलासा : २९ वर्षांच्या आदित्य ठाकरेंकडे ११ कोटी ३८ लाखांची संपत्ती!

0

विधानसभेच्या रणधुमाळीचे रणशिंग फुंकले असून महाराष्ट्रातील जनतेला निवडणुकांचे वेध लागले आहेत. जिकडे तिकडे रंगीत वातावरण, कार्यकर्त्यांचा जल्लोष आणि अर्ज भरण्याची लगबग चालू आहे. दरम्यान याच निमित्ताने पहिल्यांदा निवडणूक लढविणाऱ्या ठाकरे कुटुंबाच्या संपत्तीबद्दल लोकांना माहिती मिळत आहे. आदित्य ठाकरे अर्थात पक्षाध्यक्षाचे चिरंजिव वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत ही वार्ता आता महाराष्ट्राच्या घराघरात तर गेलीच आहे. मात्र आज जेव्हा आदित्य यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हा अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून आदित्य कोट्याधीश असल्याचं जाहीर झालं आहे. वयवर्षे २९ असणाऱ्या व्यावसायिक आदित्यच्या नावे ११ कोटीं ३८ लाख रुपयांची संपत्ती आहे याकडे लोकांचे विशेष लक्ष केंद्रीत होत आहे.

मीडिया न्यूज नुसार पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे ५४ लाख ३९ हजार ६६ रुपये इतक्या बँक ठेवी आहेत. त्यापैकी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये ३७ लाख ५ हजार ४७१ रुपये, ICICI बँकेत १२ हजार ८९१ रुपये व IDBI बँकेत ८ लाख ६७ हजार ९५ रुपये आहेत. या व्यतिरिक्त फिक्स डिपॉझिट म्हणून ICICI बँकेत २ लाख ८२ हजार ५६३ रुपये आणि २० मार्च २०१९ ला ५ लाख ७१ हजार ४७ रुपये डिपॉझिट करण्यात आले आहेत. सोबतच त्यांच्याकडे कंपन्यांचे ३७ लाख ७२ हजार ९० रुपयांचे शेअर्स व बायो ग्रीन पेपर लि. जीटीएल कंपनी, मारुती उद्योग लिमिटेड व इतर काही संस्थेत मध्येही त्यांनी पैसे गुंतविले आहेत. आणि शेवटचं त्याच्याकडे ४६ लाख २३ हजार ६८ रुपयांचे दागिने आहेत अशी माहिती या प्रतिज्ञापत्रात जोडण्यात आली अशी माहिती मिळत आहे.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे चिरंजिव अर्थात आदित्य ठाकरे हे उद्योग करतात. यातून त्यांना ही ११ कोटी ३८ लाखांची कमाई झाली आहे. यावर मिळालेल्या सविस्तर माहिती नुसार आदित्य ठाकरेंच्या नावे १० कोटी ३६ लाखांच्या बँक ठेवी आहेत. २० लाख ३९ हजार रुपयांचे बॉन्ड शेअर्स आहेत. त्यांच्याकडे साडे सहा लाखांची एक बीएमडब्लू बाईक आहे व ६७ लाख ६५ हजारांचे दागिने आहेत. त्याचबरोबर १० लाख २२ हजार रोख म्हणजे अशी एकूण ११ कोटी ३८ लाखांची संपत्ती आदित्य ठाकरेंच्या नावावर आहे असे त्यांच्या प्रतिज्ञापत्रावरून जनतेसमोर आले आहे.