Home अर्थजगत काही मिनिटांत ४४ हजार कोटी रुपये झाले गायब !

काही मिनिटांत ४४ हजार कोटी रुपये झाले गायब !

0

इन्फोसिस कंपनीचं नाव नक्कीच तुम्ही ऐकलं असेल. ही तीच कंपनी आहे जी आपल्या देशातील दुसऱ्या क्रमांकावरची आयटी कंपनी मानली जाते. याच इन्फोसिसला नुकताच ४४ कोटींचा जबरदस्त फटका बसला आहे. मीडिया न्यूज नुसार यांच्या शेअरमध्ये मागील सहा वर्षात पहिल्यांदा १४ टक्क्यांपेक्षा अधिक घसरण झाली आहे.

यापूर्वी देखील इन्फोसिसचे माजी सीईओ विशाल सिक्का आणि संस्थापक नारायण मूर्ती यांच्यातील वाद इन्फोसिस साठी तोट्याचं कारण ठरले होते. आता इन्फोसिस आपल्या उत्पन्नात आणि नफ्यांचे आकडे फुगवून सांगत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. परिणामी या आरोपाचे पडसाद मंगळवारी सकाळी शेअर बाजारात तोट्याच्या स्वरूपात उमटले आहेत. कर्मचाऱ्यांनी केलेल्या सदर आरोपांची चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

मागील आठवड्याच्या शुक्रवारी अर्थात १८ ऑक्टोबर रोजी शेअर बाजारात इन्फोसिसचे मूल्य ७६७.७५ रुपये होते. ते आज सकाळी १४ टक्क्यांनी घसरले आहेत. परिणामी ते शेअर आता ६४५ रुपये इतके झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार इन्फोसिसला आज सुमारे ४४ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.