Home आरोग्य कोरोनाचे ४७ संशयित औरंगाबादमध्ये, दिल्लीच्या तबलिग-ए- जमातमधील कार्यक्रमातून घेऊन आले कोरोना

कोरोनाचे ४७ संशयित औरंगाबादमध्ये, दिल्लीच्या तबलिग-ए- जमातमधील कार्यक्रमातून घेऊन आले कोरोना

0

दिल्लीच्या ‘तबलिग-ए- जमातमध्ये’ सहभागी होण्यासाठी गेलेले ४७ जण औरंगाबाद शहरात परत आले आहेत आज पिंपरी चिंचवड मध्ये ३२ जण आलेत.

आतापर्यंत ४० जणांची तपासणी करण्यात आली आहे. सोमवारी गांधीनगर भागात असलेल्या सात जणांना क्रांती चौक पोलिसांनी पकडून घाटी रुग्णालयात भरती केले. अन्य दोघांचा  सर्वत्र शोध सुरू आहे. या सातपैकी सहाजण हे लग्नाला गेले होते, आणि त्यामुळे ते ज्या लग्नाला गेले तिथला सुद्धा तपास सुरू आहे,असे पोलिसांनी सांगितले. पिंपरी-चिंचवडमध्ये ३२ जण आलेले आहेत. त्यामुळे कोरोना संक्रमणाचा खूप मोठा धोका निर्माण झाला आहे. कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यात आता अधिक तीव्र अडचणी निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दिल्लीतून आलेले १४ संशयित पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड महापालिका रुग्णालयात दाखल करण्यात आलेत. तर आणखी १८ जणांचा शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. दिल्लीच्या निजामुद्दीन भागात काही दिवसांपूर्वी झालेल्या एका मोठ्या मुस्लिम धार्मिय कार्यक्रमात सहभागी झालेल्यांमध्ये कोरोना व्हायरसची लक्षणे दिसू लागली आहेत. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील ३२ नागरिक सहभागी झाले होते. त्यापैकी १४ जणांचा महापालिकेने शोध घेतला आहे. बाकीजणही लवकरच दाखल करण्यात येतील ,असं महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले आहे.

दिल्लीतील निजामुद्दीनमध्ये तबलीगी जमात कार्यक्रमात दीड ते दोन हजार लोक सहभागी झाले होते असा अंदाज आहे. या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेले काही लोक इंडोनेशिया आणि मलेशियामधून आलेले होते. त्यांनी २७ फेब्रुवारी ते १ मार्च या काळात क्वाललांपूर इथं झालेल्या कार्यक्रमातसुद्धा भाग घेतला होता अशी माहिती मिळाली आहे. त्यानंतर हा गट दिल्लीतील निजामुद्दीनमध्ये धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाला.