Home महाराष्ट्र आज ५१ उमेदवारांची यादी जाहीर तर उद्या सहा जणांचा राम राम :...

आज ५१ उमेदवारांची यादी जाहीर तर उद्या सहा जणांचा राम राम : काँग्रेसचे सहा आमदार उद्या भाजपचे सदस्यत्व स्वीकारणार…

0

एकीकडे ५१ उमेदवारांची यादी जाहीर झालेली असतांना दुसरीकडे उद्या काँग्रेसचे सहा आमदार भाजप मध्ये अधिकृतपणे प्रवेश करणार असल्याची घोषणा सदर आमदारांनी उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच केली आहे. हे सर्व आमदार उद्या अर्थात सोमवारी भाजपचे सदस्यत्व स्वीकारणार असल्याची माहिती मीडिया न्यूज वरून कळत आहे. या संदर्भात सविस्तर माहिती अशी की, काँग्रेसचे सहा आमदार उद्या मुंबईतील गरवारे क्लबमध्ये मुख्यमंत्र्यांच्या अर्थात देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यात मालाडमधील अस्लम शेख, बुलडाणाच्या चिखलीमधील राहुल बोंद्रे, शिरपूरमधील काशीराम पवार, साक्रीतील डी. एस. अहिरे, सोलापूरमधील माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे आणि पंढरपूरमधील भारत भालके या सहा आमदारांचा समावेश असणार आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरू असतांना आज शिवसेनेने १४ उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप केले तर काँग्रेसनेही ५१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्याच बरोबर कोणाला उमेदवारी द्यायची यासंदर्भात आज दिल्लीत भाजपची बैठक पार पडली. अशात ६ आमदारांचा राजीनामा काँग्रेसला मोठा धक्कादायक ठरणार आहे.