Home महाराष्ट्र मुसळधार पावसामुळे कोयना धरणाचे ६ दरवाजे उघडले!

मुसळधार पावसामुळे कोयना धरणाचे ६ दरवाजे उघडले!

0

सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाच्या परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. मागील आठवड्याभरापासून होत असलेल्या जोरदार पावसाने कोयना धरण पाण्याने भरले गेल्याने धरणाचे ६ दरवाजे उघडण्यात आले. मीडिया न्यूजनुसार हे ६ वक्री दरवाजे १ फूट ९ इंचाने उघडले गेले असून कोयना नदीच्या पात्रात ९,२०० क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.

तसेच आज १५ ऑगस्टला सकाळी १०.३० च्या सुमारास याच परिसरात ३.१ रिष्टर स्केलचा भूकंपाचा धक्का जाणवला. मीडिया न्यूजनुसार या भूकंपाचा केंद्रबिंदू वारणा खोऱ्यात असून यामुळे कोयना नदीच्या काठावरील गावांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.