Home आरोग्य कोरोनासोबतच ‘सारी’ रोगाचा राज्यात शिरकाव, औरंगाबादेत ९७ रुग्ण

कोरोनासोबतच ‘सारी’ रोगाचा राज्यात शिरकाव, औरंगाबादेत ९७ रुग्ण

0

एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव हा सतत वाढत असताना दुसरीकडे औरंगाबादमध्ये गेल्या दहा दिवसात सारी( SARI: Severe Acute Respiratory Infection) या आजारामुळे ११ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. या आजाराची लक्षणे ही अगदी कोरोनाच्या लक्षनासारखीचं असतात ,या १० लोकांचा कोरोना अहवाल हा निगेटिव्ह आला होता. मात्र ‘सारी’ या आजारामूळे त्यांनी जीव गमावला आहे.

शहरामध्ये मंगळवारपर्यंत सारी आजाराचे ९७ रुग्ण आढळले होते. ‘सारी आणि कोरोना’ या दोन्ही आजारांची लक्षणे सारखीच आहेत. सारीच्या रुग्णाला एकदम सर्दी ताप येतो आणि तापाचे प्रमाण अतिशय जास्त असते. शिवाय अशक्तपणा खूप येतो. निमोनिया आणि श्‍वसनाचा त्रास होतो.छातीत दुखायला लागते, त्यामुळे नागरिकांनी आता या रोगाची सुद्धा काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

दरम्यानचं, राज्य सरकार मेडिकल स्टाफला पुरवीत असलेल्या पर्सनल प्रोटेकशन किट या किती निकृष्ट दर्जाच्या आहेत याचा पुरावा मेडिकल स्टाफने उघड केला आहे त्यांना पुरवले साधन कसे आहेत, हे त्यांनी मीडिया समोर उघड केले आहे. अशाच निकृष्ट सामानांमुळे आमच्या एक सहकार्याला कोरोना झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळं हा आमच्या जीवाशी चालत असलेला खेळ असल्याचा आरोप नर्सिंग संघटनेने केला आहे. याबाबत औरंगाबाद महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या कार्याध्यक्षा इंदुमती थोरात यांनी माहिती दिली.