Home आरोग्य “आता राज्यात कोरोनामुळे लॉकडाउनची गरज पडणार नाही” – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

“आता राज्यात कोरोनामुळे लॉकडाउनची गरज पडणार नाही” – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले की कोरोना विरुद्ध लढा आता आपण घराघरात पोहचवला आहे. लोकप्रतिनिधी, नागरिक यांच्या सहभागाने कोणत्याही परिस्थितीत ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम यशस्वी करायची आहे. तसे झाले, तर भविष्यात लॉकडाऊन करण्याची गरज पडणार नाही.

राज्यातील सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सोमवारी मुख्यमंत्री ठाकरे यांनी संवाद साधला. यामध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव संजय कुमार आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

उद्धव ठाकरे बोलले की, आता राज्यात कोरोनाचे प्रमाण हळूहळू वाढत आहे. लॉकडाऊन काळात आपण ही लाट थोपवली होती. आता आपण हळूहळू सर्व खुले करत आहोत. आणखी बऱ्याच गोष्टी सुरू करण्याची अनेकजण मागणी करत आहेत. एकूणच करोनाची वाढती संख्या पाहता करोनासोबत कसे जगायचे ते आता शिकवावे लागणार आहे आणि या मोहिमेत आपण तेच करणार आहोत, असे ठाकरे म्हणाले.

ऑक्सिजनचा अपव्यय आपण टाळला पाहिजे. सध्या राज्यात 1000 मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादन होते, मात्र गरज 500 मेट्रिक टन इतकी आहे. ऑक्सिजनचा तुटवडा राज्यात नाही, सध्या उत्पादन पुरेसे असले तरी पुढील काळात गरज पडू शकते.