Home महाराष्ट्र अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश!

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश!

0

प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे व इतर नेत्यांच्या उपस्थितीत मातोश्री येथे शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. रश्मी ठाकरे यांनी उर्मिला मातोंडकर यांना शिवबंधन बांधले. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात उर्मिला मातोंडकरांनी काँग्रेस पक्षातून सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आज त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

२०१९ ला उर्मिला यांनी काँग्रेस पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढवली होती ज्यात त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून त्या काँग्रेसमधून बाहेर पडल्या होत्या. दिवसांपूर्वी कंगना राणावत सोबतच्या ट्विटरवरील वादामुळे त्या चर्चेत आल्या होत्या. आता शिवसेना प्रवेशामुळे त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. शिवसेनेच्या अधिकृत ट्विटरवरून याबद्दलची माहिती देण्यात आली. तसेच अनेक शिवसेना नेत्यांनी ट्विट द्वारे त्यांना शुभेच्छा दिल्या.