
महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद बाब : तब्बल ४० वर्षांनंतर नरवणे यांच्या रुपात लष्कराचे नेतृत्व मराठी माणसाकडे जाणार आहे. मीडिया रिपोर्ट नुसार विद्यमान लष्करप्रमुख जनरल विपीन रावत येत्या महिन्या अखेरीस अर्थात ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत. परिणामी त्यांची ही जबाबदारी आता मनोज नरवणे या मराठी माणसाकडे जाणार आहे.
संरक्षण मंत्रालयाने या पदाकरिता तीन अधिकारी निवडून त्यांची नावे पाठवली होती. भारताचे नवे लष्करप्रमुख त्यापैकी पुण्याचे सुपुत्र आणि भारतीय लष्करातील लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे सर्वात जेष्ठ अधिकारी असल्याने त्यांना ही जबाबदारी देण्यात आली. ही निवड मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने केली असून यात नरेंद्र मोदी व अमित शहा यांचा देखील समावेश आहे. महाराष्ट्रासाठी ही अभिमानास्पद बाब असून पुण्याचे सुपुत्र आणि भारतीय लष्करातील लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे भारताचे नवे लष्करप्रमुख होणार आहेत.