Home महाराष्ट्र पुणे Video : राष्ट्रवादीचे हे बाप बेटे या दोन दिग्गज खासदारांना देऊ शकतील...

Video : राष्ट्रवादीचे हे बाप बेटे या दोन दिग्गज खासदारांना देऊ शकतील का लढत ?

0

प्राईम नेटवर्क : काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातील जागा वाटपाचा पेच आता संपत आला आहे, ‘इंडियन एक्सप्रेस’ या वृत्तपत्राने दिलेल्या बातमी नुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उप मुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार हे मावळ लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहे.

या ठिकाणी सध्या शिवसेनेचे श्रीरंग अप्पा बारणे हे खासदार असून त्यांनी माजी खासदार गजानन बाबर यांचा विरोध पत्करून हि निवडणूक जिंकली होती, नगरसेवक ते खासदार असा प्रवास केलेले शिवसेनेचे खासदार श्रीरंग अप्पा बारणे हे मावळ मधील गेम चेंजर उमेदवार ठरले होते. शिवसेनेच्या संघटनात्मक कार्यकर्त्यांनी या वेळी शर्थीने लोकसभा लढविली होती आणि त्यांनी येथील विजय प्राप्त केला होता.

कोण पार्थ पवार ? कोणीही पवार लढायला आला तरी मला फरक पडणार नाही : श्रीरंग बारणे

दुसरी कडे शिरूर लोकसभा मतदार संघात, उद्योगपती आणि खासदार शिवाजीराव आढळराव पाटील जवळपास गेली पंधरा वर्ष या मतदार संघात आपला पाय रोवून घट्ट उभे आहेत, या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार हे निवडणूक लढविण्याच्या विचारात असल्याची माहिती मिळत आहे.

शिरूर लोकसभा मतदार संघात, ग्रामपंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषद यात राष्ट्रवादीचं प्राबल्य असून त्यांना आत्ता पर्यंत खासदार आढळरावां विरुद्ध म्हणावा तितका तगडा उमेदवार देता आला नाही, शिरूर लोकसभेत ते आत्ता पर्यंत लाखोंच्या फरकाने निवडणून आले आहेत. अशा वेळी शिरूर लोकसभा मतदार संघात अजित पवार यांनी उभं राहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.